शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 26 मे 2018 (15:35 IST)

सीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली  असून, 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परिक्षेत संपूर्ण देशातून  गाझियाबादची येथील  मेघना श्रीवास्तव देशात पहिली आहे. हा सर्व निकाल पालक मुलांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहेत. यावेळी सीबीएसई परीक्षेचा  ८३.१ इतका लागला असून,  मागील वर्षी  निकाल 82.02 टक्के होता.मार्च-एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेला देशभरातून एकूण 11, 86, 306  विद्यार्थी बसले होते. 4, 138 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. 

 बारावीची परीक्षा 13 एप्रिल रोजी संपणार होती. शेवटचा पेपर फिजिकल एज्युकेशन विषयाचा होता. पण देशातील अनेक ठिकाणी पेपर लीक झाल्याने अर्थशास्त्राचा पेपर रद्द करण्यात आला होता. 25 एप्रिल रोजी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेण्यात आला होता.विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटसह cbseresults.nic.inresults.nic.in आणि results.gov.in वर पाहता येणार आहे.