सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 मार्च 2018 (09:18 IST)

सीबीएसईचे दोन पुन्हा होणार

cbse paper leak

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने पेपरफुटीमुळे मोठा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीचे फुटलेले पेपर पुन्हा घेण्यात येणार आहेत. दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा होणार आहे. त्याबाबतचं वेळापत्रक लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.

कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून बोर्डाने दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. दहावीचा गणिताचा पेपर 28 मार्चला झाला होता. तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर 27 मार्चला घेण्यात आला होता. दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांदरम्यान, पेपरफुटीच्या अनेक घटना घडल्या. त्याचं लोण महाराष्ट्रातही पसरलं होतं. या पेपरफुटीमुळे सीबीएसईने दोन पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे.