गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (07:31 IST)

चंद्रयान 3: चंद्रावर आजवर कुणी-कुणी पाऊल ठेवलंय? फक्त 2 नाही, 12 जण आहेत

apollo moon mission
चंद्रावर आजवर किती जणांनी पाऊल ठेवलंय? तुम्हाला जास्तीत जास्त दोन नावं आठवू शकतील – नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन.पण त्यानंतर 1969 पासून चंद्रावर मानवाने पाऊल ठेवलंच नाही का?
असं नाहीय.
1969 साली माणूस पहिल्यांदा चंद्रावर गेला होता, ते होतं नासाचं अपोलो 11 मिशन. त्यानंतर अनेक अपोलो मोहिमांमध्ये अमेरिकेच्या नासाने मानवाला चंद्रावर पाठवलं आहे.
 
एक नजर टाकू या आजवर कोण कोण चंद्रावर जाऊन आलं आहे.
 
1. अपोलो 11 (जुलै 1969)
16 जुलै 1969 रोजी अपोलो 11 हे अंतराळयान अमेरिकेच्या केप केनडी येथून तीन अंतराळवीरांना घेऊन चंद्राच्या दिशेने झेपावलं – कमांडर नील आर्मस्ट्राँग, कमांड मॉड्यूलचे पायलट मायकल कॉलिन्स आणि लुनार मॉड्यूलचे पायलट एडविन ‘बझ’ ऑल्ड्रिन.
 
यापैकी चंद्राच्या कक्षेत प्रवेश अपोलोने प्रवेश केल्यानंतर कमांड मॉड्यूल लुनार मॉड्यूलपासून वेगळं झालं, ज्यात मायकल कॉलिन्स हे चंद्राभोवतीच्या कक्षेत भ्रमंती करत होते.
 
तर लुनार मॉड्यूल ‘ईगल’ चंद्राच्या पृष्ठभूमीच्या दिशेने रवाना झालं. त्यात होते आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन
 
20 जुलै 1969 रोजी आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवत म्हटलं, “हे एका मानवासाठी एक छोटं पाऊल आहे, पण मानवजातीसाठी मोठी उडी आहे.”
 
नंतर तिघेही 4 दिवसांनंतर 24 जुलै रोजी त्यांचं यान प्रशांत महासागरात सुरक्षितरीत्या कोसळलं होतं.
 
2. अपोलो 12 (नोव्हेंबर 1969)
पहिल्या यशस्वी मानवी चांद्र मोहिमेनंतर अवघ्या चार महिन्यात नासाने अपोलो 12 मोहीम लाँच केली. 14 नोव्हेंबर 1969 रोजी जेव्हा हे यान झेपावलं, तेव्हा यावर वीज पडली होती, त्यामुळे 36व्या आणि 52व्या सेकंदाला नासाचा या यानाशी संपर्क तुटला होता.
 
त्यात चार्ल्स कॉनरॅड आणि ॲलन बीन असे दोन अंतराळवीर या यानात होते. त्यांनी आधी लुनार मॉड्यूलमध्ये जाऊन चेक केलं की वीज पडल्यामुळे काही नुकसान तर झालं नाही आहे ना.
 
पण सारं काही सुरक्षित होतं, हे लक्षात आल्यावर ते चंद्राच्या दिशेने पूर्ण जोमाने निघाले.
 
नंतर 20 नोव्हेंबर रोजी अनेकदा अटीतटीचे निर्णय घेत, सर्व तांत्रिक अडथळ्यांवर मात करत त्यांचं लुनार मॉड्यूल इंट्रिपिड चंद्रावर उतरलं. चार्ल्स कॉनरॅड हे चंद्रावर लँड करणारे तिसरे आणि ॲलन बीन चौथे अंतराळवीर बनले.
 
3. अपोलो 14 (जानेवारी 1971)
दोन यशस्वी अपोलो मोहिमांनंतर अमेरिकेला तिसऱ्या मोहिमेत झटका बसला.
 
अपोलो 13 मोहिमेदरम्यान यानातच एक स्फोट झाल्यामुळे ते मिशन अबॉर्ट करावं लागलं होतं. अखेर तीच जबाबदारी अपोलो 14वर सोपवण्यात आली.
31 जानेवारी 1971 रोजी लाँच झालेल्या अपोलो 14 यानामध्ये कमांडर ॲलन शेफर्ड आणि एड्जार मिचेल असे दोन अंतराळवीर होते. यापैकी शेफर्ड हे चंद्रावर पाऊल ठेवणारे एकूण पाचवे आणि तोवरचे सर्वांत वयोवृद्ध अंतराळवीर ठरले.
 
तेव्हा त्यांचं वय होतं 47 वर्षं. त्यांनी एकूण चंद्रावर 9,000 फूट प्रवास करण्याचा विक्रमही केला होता.
 
त्यांच्यासोबत असलेले एड्जार मिचेल हे चांद्रभूमीवर चालणारे सहावे अंतराळवीर होते. दोघांनीही चंद्रावर माती आणि खडक आणले होते.
 
4. अपोलो 15 (जुलै 1971)
 
तब्बल 18 तास 37 मिनिटं त्यांनी चंद्रावर सुमारे 28 किलोमीटर ती गाडी चालवली, आणि एकूण 77 किलो माल चंद्रावरून पृथ्वीवर परत आणला होता.
 
यासोबतच डेव्हिड स्कॉट आणि जेम्स अर्विन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे अनुक्रमे सातवे आणि आठवे अंतराळवीर ठरले. दुर्दैवाने अर्विन हे आजवर चंद्रावर उतरलेल्या अंतराळवीरांपैकी मरण पावणारे सर्वांत तरुण आणि पहिले अंतराळवीर ठरले.
 
5. अपोलो 16 (एप्रिल 1972)
नासाने सहा महिन्यांनीच 26 जुलै 1971 रोजी डेव्हिड स्कॉट आणि जेम्स अर्विन यांना चंद्रावर घेऊन जाणारं अपोलो 15 लाँच केलं.
 
चार दिवसांनंतर यशस्वीरीत्या चंद्रावर लँड केल्यानंतर स्कॉट आणि अर्विन यांनी पहिल्यांदा चंद्रावर एक वाहन चालवलं.
 
नासाच्या अपोलो 16 मोहिमेची तीन उद्दिष्टं होती – डेस्कार्टेस प्रांतातल्या माती-खडकांचं, भूमीचं परीक्षण करणं, त्या जमिनीवर प्रयोगांसाठी सेटअप करणे, आणि चंद्रावर अंतराळयानात काही प्रयोग करून पाहायचे, सोबतच चंद्राच्या कक्षेतून काही फोटो काढायचे. यासाठी या मोहिमेदरम्यान विशेष कॅमेरेही पाठवण्यात आले होते.
 
16 एप्रिल 1972 रोजी पृथ्वीवरून झेपावलेलं अपोलो 16 चार दिवसानंतर 20 एप्रिलला लँड झालं. नंतर हे यान चंद्रावर सुमारे 71 तास होतं. यादरम्यान जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक हे चंद्रावर पाऊल ठेवणारे 9वे आणि 10वे व्यक्ती होते.
 
6. अपोलो 17 (डिसेंबर 1972)
1972चं अपोलो मिशन अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. या मोहिमेतही दोन अंतराळवीर होते - एक कमांडर युजीन सर्नन, ज्यांनी आधी चंद्रावर पाऊल ठेवलं.
 
पण त्यांच्यासोबत प्रथमच एक अशी व्यक्ती होती, जी कुठल्याही लष्करी पार्श्वभूमीचे नव्हती.
 
ते होते शास्त्रज्ञ हॅरिसन श्मिट. ते एक अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी चंद्रावर सहावं ऑटोमेटेड रिसर्च सेंटर स्थापन केलं होतं.
 
या दोघांनी चंद्रावर चालवलेल्या एका वाहनात तब्बल 30 किलोमीटर प्रवास केला. आणि सुमारे 75 तासांच्या त्यांच्या चांद्र काळात त्यांनी 110.4 किलो सामान चंद्रावरून गोळा करून पृथ्वीवर परत पाठवलं होतं.
 
तर ही होती ती 12 माणसं, ज्यांनी आजवर चंद्रावर पाऊल ठेवलं आहे.
 
तुम्हाला तुम्हाला हे नव्हतं माहिती ना? खरं सांगा? आणि ही बातमी जरूर शेअर करा.
 



Published By- Priya Dixit