शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 सप्टेंबर 2018 (15:56 IST)

देशात बालमृत्यूची संख्या कमी झाली

भारतामध्ये 2017 साली 8,02,000 बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच वर्षातील बालमृत्यूची संख्या लक्षात घेता ही संख्या कमी आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या( युएनआयजीएमई) संस्थेने आपल्या अहवालात दिली आहे.
 
अहवालानुसार 2017 साली 6,05,000 नवजात बालकांचा आणि पाच ते चौदा वर्ष वयोगटातील 1,52,000 बालकांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा मृत्यूदर गेल्या पाच वर्षाच्या बालमृत्यूदारापेक्षा सर्वात कमी असल्याचे युनिसेफच्या प्रवक्त्या यास्मीन अली हक यांनी म्हटले आहे. तसेच रुग्णालयात प्रसूतीस येणाऱ्या महिलांची संख्याही वाढली आहे. त्याचबरोबर नवजात बालकांच्या देखभालीबरोबरच त्यांना योग्यवेळी लसही देण्यात येत आहेत. हे देखील बालमृत्यू दर घटण्याचे कारण  आहे.
 
नवीन आकडेवारीनुसार 2016 साली बालमृत्यूदर 8.67 एवढा होता. पण 2017 मध्ये तो कमी झाला असून ही आकडेवारी 8.02 लाख झाली आहे. लैंगिक आधारावर हा मृत्यूदर बघितल्यास २०१७ मध्ये १,००० मुलांवर ३० एवढा होता. तर मुलींचा मृत्यूदर 1000 वर 40 एवढा होता. पण आता चित्र बदलल्याचे हक यांनी सांगितले आहे.