गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (12:16 IST)

जम्मू काश्मीर मध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

Clashes between security forces and militants in Jammu and Kashmir
दक्षिण काश्मीरमधील शोपियामध्ये शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. काश्मीर झोन पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, झैनापोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. नाकाबंदी होत असल्याचे पाहून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर जोरदार गोळीबार केला. प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला.
 
या चकमकीत लष्कराचे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. याआधी शुक्रवारी श्रीनगरमधील नौहट्टा भागातील ख्वाजा बाजारमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.
 
रस्त्यावर फेकण्यात आलेल्या ग्रेनेडच्या स्फोटात जवळपासच्या तीन दुकानांच्या काचा फुटल्या आणि एका ऑटोचेही नुकसान झाले. हल्ल्यानंतर लगेचच पोलीस आणि सुरक्षा दलांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी संयुक्त कारवाई सुरू केली. त्याच वेळी, शोपियाँ मध्ये गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ ब्लॉकवर ग्रेनेड फेकले होते, ज्यात एका वाहनाचे नुकसान झाले होते.
 
एलओसीवर ठार झालेल्या घुसखोरांकडून अमेरिकन शस्त्रे मिळतात: जीओसी  चांदपुरिया डैगर विभागाचे जीओसी मेजर जनरल अजय चांदपुरिया यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेजवळ मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि विशेष उपकरणे जप्त करण्यात येत आहेत. अशी शस्त्रे खोऱ्यात प्रथमच पाहायला मिळत आहेत. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात ही शस्त्रे टाकून निघून गेली. यावरून दहशतवादीही शस्त्रांसह तेथे येऊ शकतात, हे स्पष्ट झाले आहे.