शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बंगळुरू , बुधवार, 1 ऑगस्ट 2018 (12:42 IST)

स्वतंत्र उत्तर कर्नाटकच्या मागणीसाठी उद्या 'बंद'

स्वतंत्र उत्तर कर्नाटक राजच्या मागणीसाठी 2 ऑगस्ट रोजी उत्तर विभागातील 13 जिल्ह्यात 'बंद'ची हाक देण्यात आली आहे.
 
स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची मागणी उत्तर कर्नाटक प्रत्येक राज्य होराटा समितीने उचलून धरली आहे. जोपर्यंत उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील असा इशारा या समितीने सरकारला दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या समितीने 2 ऑगस्ट रोजी 13 जिल्ह्यात बंद पाळणचा निर्णय घेतला आहे. राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारने नेहमी या   विभागाकडे दुर्लक्ष केले आहे. या भागाच्या विकासासाठी पुरेसा निधीही उपलब्ध करुन दिला नाही. असा आरोप करीत त्यांनी बंदचे आवाहन केले आहे.
 
मुख्यमंत्री कुारस्वामी यांनी 5 जुलै रोजी विधिंडळात अर्थसंकल्प सादर केला. परंतु या 13 जिल्ह्यांच्या  विकासासाठी पुरेसा निधीची तरतूद केली नाही. तसेच मंत्रिमंडळात योग्य प्रतिनिधित्वही देण्यात आलेले नाही, असा आरोपही या समितीने केला आहे. 
 
भाजपचे आदार श्रीरामुलु यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सरकारवर टीकेची झोड उठवत वक्तव्य  केले होते की, राज्य सरकारने उत्तर विभागाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची मागणी तीव्र झाली आहे. स्वतंत्र उत्तर कर्नाटकची मागणी गतिमान होण्यास राज्य सरकारच पूर्णपणे जबाबदार आहे. उत्तर कर्नाटक स्वतंत्र झाल्यावर निधीची तरतूद करणार का? असा सवालही श्रीरामुलु यांनी मुख्यमंत्र्यांना केला होता.