सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2022 (09:25 IST)

काँग्रेस सुधारणार नाही, आपल्यालाही बुडवेल-प्रशांत किशोर

Prashant kishor
"काँग्रेस स्वत: सुधारणार नाही आणि आपल्याला बुडवेल, असं म्हटलं. काँग्रेसबद्दल माझ्या मनात आदर आहे मात्र त्यांची सध्याची स्थिती सर्वांना माहिती आहे", असं राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
 
"2011 पासून 2021पर्यंत मध्ये मी 11 निवडणुकांसबधी काम केली. त्यापैकी एका निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, असं प्रशांत किशोर म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत व्हावं लागलं होतं. तेव्हापासून त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. या लोकांनी माझं रेकॉर्ड देखील खराब केलं, असं प्रशांत किशोर म्हणाले. मात्र, पराभवातून खूप शिकता आलं", प्रशांत किशोर म्हणाले.

काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. बिहारच्या हाजीपूरमध्ये काँग्रेसमुळं माझं रेकॉर्ड खराब झाल्याचं म्हटलं. आता पुढील काळात काँग्रेससोबत काम करणार नसल्याचा मोठा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.