1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

प्रेमी जोडप्यांवर साक्षी महाराजांचे विधान, म्हणाले...

Couples vulgar behaviour in cars
जयपूर- भाजप खासदार साक्षी महाराज यांनी एक वादग्रस्त टिप्पणी करत म्हटले की सार्वजनिक रूपात प्रेमाचे प्रदर्शन करणार्‍या जोडप्यांना कोठडीत टाकायला हवे.
 
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून लोकसभा खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले की बाइक असो, कार असो किंवा पार्क, जोडपे अश्लील वागताना दिसून जातात. ते एकमेकांना आलिंगन करतात जसे की मुलगा मुलीला आणि मुलगी मुलाला जणू खाऊनच टाकतील.
 
साक्षी महाराज यांनी राजस्थानच्या भरतपूर येथे म्हटले की काही चुकीचे घडण्यापूर्वीच अश्या जोडप्यांविरुद्ध कारवाई करत त्यांना जेलमध्ये टाकणेच योग्य ठरेल. त्यांनी म्हटले की अशा गोष्टींकडे सर्व दुर्लक्ष करतात परंतू बलात्कार सारख्या घटना घडल्यावर मात्र पोलिस कारवाईची मागणी करू लागतात.
 
पूर्वी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांचा बचाव करून चुकले साक्षी महाराज यांनी म्हटले की त्यासोबत माझा काहीही संबंध नाही परंतू काही राजकारणी मतांसाठी बोगस बाबांची मदत मागतात.
 
त्यांनी म्हटले की राम रहीम आणि रामपाल सारखे लोकं वोट बँकचे राजकारण यातून निघालेले आहेत आणि राजकारणी लोकांना काय अश्या बाबांना प्रोत्साहित केले पाहिजे यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.