गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 एप्रिल 2018 (15:24 IST)

चिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी

अल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल उचलले आहे.  सरकारने अल्पवयीन चिमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पास्को कायद्याअंतर्गत बदल करण्यास सुरुवात केली आहे.  केंद्र सरकारतर्फे  सुप्रिम कोर्टात एक प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार, 0-12 वर्षांच्या चिमुरड्यांसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी असा प्रस्ताव केंद्र सरकारने मांडला आहे. त्यासाठी पॉस्को कायद्यात बदल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. अल्पवयीन चिमुरड्यांवर होणाऱ्या बलात्कारासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने लिखीत उत्तर दिलं. सर्वोच्च न्यायालय 27 एप्रिलला पुढील सुनावणी करणार आहे. 

जम्मू कश्मीरमधील कथुआत आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणामुळे देशात संतापाची लाट उसळली. त्यानंतर अल्पवयीन चिमुरड्यावर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी असी मागणी देशभरामध्ये होत आहे.