1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. devendra fadnavis

मदत ऐच्छिक असावी तडजोडीसाठी नव्हे असेच माझे मत – मुख्यमंत्री

devendra fadnavis
ऐ दिल है मुश्किल  या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी निर्माते आणि राज ठाकरे यांच्यात मध्यस्थी केल्यामुळे पुन्हा वाद सुरु झाला आहे. आता ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट प्रदर्शनाच्या मोबदल्यात 5 कोटींची मदत सैनिक कल्याण निधीला देण्याच्या प्रस्तावाला विरोध होता असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मदत ऐच्छिक असावी तडजोडीसाठी नव्हे असंच माझं मत होतं. त्याबद्दलचं माझं मत मी राज ठाकरे यांच्यासमोरच व्यक्त केलं होतं. पण चित्रपट निर्मात्यांनी 5 कोटींची मदत देण्यास उत्सुक असल्याचं सांगितल्यानेच अखेर हा तोडगा काढला. सोबतच या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी विनंती केल्यानेच मी या वादात मध्यस्थी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
पुढील लेख
मुंबईतील आणखी ७ उपनगरीय रेल्वे स्थानकामध्ये वायफाय सुविधा