शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जुलै 2018 (09:04 IST)

सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘तेलुगू देसम’च्या खासदारांनी दाखल केलेला मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वीकारला आहे. त्यावर शुक्रवारी चर्चा होणार आहे. भाजप सरकारसाठी ही अग्निपरीक्षाच ठरणार आहे.
 
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दिवशी लोकसभेत प्रश्नोत्तरांसाठी वेळ देता येणार नाही. तसेच खासगी विधेयकेही सादर करता येणार नाहीत, असे लोकसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभेत पहिल्यांदाच दाखल करून घेण्यात आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसमने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाला काँग्रेससहित सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.