मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 मार्च 2019 (13:48 IST)

राफेल प्रकरणाच्या फाईल चोरीची तक्रार नाही हा भ्रष्टाचार नाही का - शरद पवार

Do not report Raphael's case theft - is it not corruption?
गेली ५२ वर्षे खंड न पडता मला निवडून आणण्याचे काम या महाराष्ट्राने केले. याच महाराष्ट्रात माझी कामगिरी सर्वत्र पोहचवण्याचं काम यशवंतराव चव्हाण यांनी केले. म्हणूनच यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीपासून आपल्याला प्रचाराची सुरुवात करावी लागते.
 
यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना त्यांनी देशाच्या संरक्षणात अनेक प्रयत्न केले. देशात नाशिक, बंगळूर, लखनऊ अशा तीन ठिकाणी शस्त्रनिर्मितीचे कारखाने उभारले. परंतु या सरकारने हे कारखाने बंद पाडून राफेलसारखे विमान अंबानीच्या रिलायन्स कंपनीला बनवण्याचे कंत्राट देण्याचे काम केले असे शरद पवार यांनी विचारले आहे.
 
शरद पवार पुढे म्हणाले की, आमच्या काळात इंदिराजींनी पाकिस्तानातून येणाऱ्या घुसखोरांना चांगला धडा शिकवला. यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना त्यांनी आपली भूमिका चोख बजावली. आजचे देशातील राज्यकर्ते देशात होणाऱ्या चकमकींना राजकीय वळण देऊन राजकारणात फायदा करुन घेत आहेत.
 
भ्रष्टाचार कमी करण्याची घोषणा मोदी सरकारने दिली. परंतु यांच्या काळात सीबीआयचे गव्हर्नर तीन महिन्यांच्या आत राजीनामा देतात ही चिंतेची बाब आहे. राफेलसारखा विषय हा अत्यंत गंभीर आहे. आमच्या काळात साडेतीनशे कोटीला ठरलेलं विमान १६०० कोटीला खरेदी होते याला नेमकं काय म्हणायचं?
 
याची चौकशीकरण्याची मागणी केली असता सुप्रीम कोर्टाकडे राफेलचे कागदपत्र हरवण्याचे किंवा चोरीला गेल्याचे सांगितले जाते. परंतु यासंदर्भात कोणतीही तक्राराची नोंद केल्याची माहिती पोलिस प्रशासनात नाही हा नेमका भ्रष्टाचारच म्हणावा का? असेही पवार महाआघाडीच्या सभेत  म्हणाले आहेत.