शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 14 मार्च 2023 (20:04 IST)

नशेत टीसीने महिलेच्याअंगावर लघवी केली, टीटीला अटक

फ्लाईट नंतर आता ट्रेन मध्ये एका टीसी कडून अमृतसरहून कोलकाता जाणाऱ्या अकाल तख्त एक्स्प्रेसमध्ये रविवारी रात्री एक लाजिरवाणी घटना घडली. या ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या टीसीने महिलेच्या डोक्यावर लघवी केली. महिलेने आरडाओरडा केला तेव्हा पतीने टीसीला पकडून सोमवारी सकाळी चारबाग येथील जीआरपीच्या ताब्यात दिले. यानंतर जीआरपीने आरोपी टीसीला अटक करून तुरुंगात पाठवले. टीसीने हे कृत्य केले तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता, असे सांगण्यात येत आहे. 
 
वृत्तानुसार, अमृतसरचे रहिवासी राजेश आपल्या पत्नीसोबत अकाल तख्त एक्स्प्रेसच्या A-1 डब्यातून प्रवास करत होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी त्यांच्या सीटवर झोपली होती. त्यामुळे बिहारच्या टीसी मुन्ना कुमारने डोक्यावर लघवी केली. पत्नीने आरडाओरडा केला तेव्हा प्रवाशांनी टीसीला पकडले. जमावाने टीसीला बेदम मारहाण केली. त्यावेळी टीसी नशेत असल्याचे लोकांनी सांगितले. नवरत्न गौतम सांगतात की, राजेशच्या तक्रारीवर अहवाल दाखल केल्यानंतर मुन्नाला अटक केली असून न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
 
 
Edited By - Priya Dixit