बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

एक्झिट पोल : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये कमळ?

देशाचा राजकारणाची दिशा ठरवणार्‍या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) अंदाज जाहीर झाले आाहेत. उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थात 'नमो'लाट दिसून आली आहे. सीएनएन आयबीएन आणि इंडिया टुडेच्या अंदाजानुसार, राज्यात भाजप हा क्रमांक एकचा पक्ष ठरणार आहे. दरम्यान गेवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्येही भाजपचेच कमळ फुलणार तर पंजाबमध्ये काँग्रेसला सत्ता मिळेल, आस अंदाज या चाचण्यांमध्ये वर्तवण्यात आला आहे. 
भाजप बहुमताच्या जवळपास असून 185 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर विकासाच्या लाटेवर स्वार होऊन पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊ, अशी अखिलेश यादव यांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत, असे चित्र आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळतील. आघाडीला 120 जागाच जिंकता येतील, असा कयास आहे. तसेच मायावती यांच्या बसपला 90 जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज आहे. नरेंद्र मोदींच्या लाटेत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची सायकल पंक्चर होईल, असेच या एक्झिट पोलच्या अंदाजातून दिसतो.