शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 26 जानेवारी 2021 (17:16 IST)

शेतकरी आंदोलन : हिंसक झटापटीत एकाचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला ठिकठिकाणी हिंसक वळण लागलं असून पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळत आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. 
 
आयटीओ परिसरात ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा ट्रॅक्टरचा कोलमडला. आयटीओ परिसरात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात येत होता. या शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
 
नांगलोई या भागात तणावपूर्ण स्थिती असल्याचं सांगितलं जातं आहे. नांगलोईत हजारो शेतकरी उपस्थित आहेत आणि ते दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. याठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराचा मारा केला आहे.
 
ट्रॅक्टर परेडदरम्यान अक्षरधाम फ्लायओव्हर परिसरात शेतकरी आंदोलक आणि पोलीस यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला.
 
दरम्यान ट्रॅक्टर परेड शांततामय पद्धतीने करायची होती हा आमचा सहमतीने घेतलेला निर्णय होता. मात्र ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या आहेत ते योग्य नाही असं शेतकरी नेत्याने सांगितलं.
 
ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेड्स तोडले आहेत, तर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.