शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 5 सप्टेंबर 2021 (17:29 IST)

शेतकरी कायद्यां विरोधात शेतकऱ्यांची 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा

शेतकरी कायद्यां विरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक होऊन प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये संयुक्त किसान मोर्चा संघटनेच्या वतीने आज (रविवार, 5 सप्टेंबर) किसान महापंचायत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.या मध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंद करण्याची घोषणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे.या मुळे केंद्र सरकार अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. शहरात काल रात्रीपासूनच शेतकरी दाखल होण्यास सुरुवात झाली होती.अजूनही शेतकरी मुजफ्फरनगर मध्ये येत आहेत.शहरातील सर्व रस्त्यांवर लोकांची गर्दी आहे.तसंच मैदानांमध्ये वाहनं, ट्रॅक्टर आणि बस यांचीच गर्दी दिसून येत आहे.
 
महापंचायतीच्या व्यासपीठावर भारतीय शेतकरी युनियन संघटनेचे नेते राकेश टिकैत आणि अध्यक्ष नरेश टिकैत यांच्याशिवाय किसान मोर्चाशी संबंधित सर्व मोठे नेते उपस्थित आहेत.
मुजफ्फरनगर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.शेतकऱ्यांनी कृषी कायद्या परत द्यावा अशी मागणी केली आहे.यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन बऱ्याच महिन्यांपासून सुरु आहे.सध्या केंद्र सरकारवर लक्ष साधून शेतकरी नेते राकेश टिकैत हे मेळावे भरत असून शेतकरी आंदोलन पुन्हा जोर धरण्याच्या मार्गावर आहे.कृषी कायद्यावर केंद्र सरकार आणि शेतकरींमध्ये चर्चा झाली होती.परंतु या चर्चेतून काहीच निष्पन्न निघाले नाही.याअनुषंगाने राकेश टिकैत यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंद करण्याची घोषणा केली आहे.
 
शेतकरी नेते टिकैत म्हणाले की, ही लढा कृषी कायदे आणि पिकाची आधारभूत किमतीची आहे. शेतकरीच्या पिकाला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकरी मतदान करणार नाही.उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत.हे बघता टिकैत यांनी शेतकऱ्यांची किसान महापंचायत या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.आता अशा सभा फक्त उत्तर प्रदेशात नव्हे तर संपूर्ण देशात घेतल्या पाहिजे असे शेतकरी नेते टिकैत म्हणाले.