नैनितालमध्ये भीषण अपघात 8 जणांचा मृत्यू  
					
										
                                       
                  
                  				  उत्तराखंडमधील नैनिताल येथे सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला
				  													
						
																							
									  
	सोमवारी रात्री उशिरा उत्तराखंडमधील नैनितालच्या मल्लागाव, उंचाकोट, बेतालघाट ब्लॉकमध्ये पिकअप वाहन खोल खड्ड्यात पडल्याने आठ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले.
				  				  
	
	मृतांमध्ये चालक राजेंद्र कुमार हा मूळचा नेपाळचा आहे. घटनेची माहिती मिळताच बेतालघाट पोलिसांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांसह बचावकार्य हाती घेतले. बचावकार्यानंतर सर्व 8 जणांना  मोठ्या मुश्किलीने बाहेर काढण्यात आले. संपूर्ण घटनास्थळी पोलिसांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. बेतालघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिश अहमद यांनी सांगितले की, रात्री उशिरा उचकोटमधील मल्लागाव येथील 10 मजूर काम संपवून हल्द्वानीकडे जात असताना त्यांचे वाहन नियंत्रणाबाहेर गेले आणि 200  मीटर खोल दरीत  पडले. यामध्ये आठ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	
	Edited by - Priya Dixit