गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (21:54 IST)

वृत्तपत्रांमध्ये खाद्यपदार्थ बांधुन देणं त्वरीत बंद करा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आदेश

Food and Drug Administration orders immediate cessation of food binding in newspapers
वृत्तपत्रांमध्ये खाद्यपदार्थ बांधुन देणं त्वरीत बंद करावं अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. अनेक ठिकाणी वडापाव, पोहे, भजी इत्यादी यासारखे खाद्यपदार्थ वृत्तपत्रांमध्ये बांधुन देतात त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. जनतेला  सुरक्षित आणि सकस अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा संपुर्ण देशात यापूर्वीच लागू करण्यात आला आहे. 
 
वृत्तपत्राची शाई ही केमिकल पासून बनवलेली असते. केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी करतात. वृत्तपत्रांमध्ये गरम खाद्यपदार्थ बांधुन ग्राहकांना दिले जातात. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो.त्यामुळे सर्व अन्न व्यवसायिक, हॉटल्स, बेकरी व्यवसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी आणि भेळ विक्रेत्यांनी वृत्तपत्रांमध्ये अन्न पदार्थांचं पॅकिंग त्वरीत बंद करावे, अन्यथा अन्न सुरक्षा व मानदे कायद्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.