शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (23:57 IST)

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

नवी दिल्ली- माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं हृदय विकाराच्या धक्कानं निधन झालं आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या. 
 
तीन तासांपूर्वीच स्वराज यांनी ट्विट करुन काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते. या क्षणाची मी आयुष्यभर वाट पाहत होते, असं स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
 
त्यानंतर काही वेळातच छातीत वेदना होत असल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर थोड्या वेळातच त्यांचं निधन झालं.
 
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या असलेल्या सुषमा स्वराज यांनी मोदी सरकार-१ मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव 2019 लोकसभा निवडणूक लढवली नाही.