1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 23 जून 2024 (15:51 IST)

Chardham Yatra: बद्रीनाथ आणि यमुनोत्रीमध्ये चार यात्रेकरूंचा मृत्यू,मृतांची संख्या 150 च्या पुढे

Uttarakhand
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेतील आणखी चार यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. राज्य आपत्ती परिचालन केंद्रानुसार, बद्रीनाथमध्ये दोन आणि यमुनोत्री धाममध्ये दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आता चारधाम यात्रेत प्राण गमावलेल्या प्रवाशांची संख्या 157 वर पोहोचली आहे.

चारधाम यात्रेदरम्यान केदारनाथमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 73 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी बद्रीनाथमध्ये 38, गंगोत्रीमध्ये 13 आणि यमुनोत्री धाममध्ये 29 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. 
 
गेल्या वर्षी चारधाम यात्रेत सुमारे 200 यात्रेकरूंचा मृत्यूझाला. चारधाम यात्रेनंतर सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, केदारनाथ मध्ये 96 , बद्रीनाथ मध्ये 33 , यमुनोत्री मध्ये 34 , गंगोत्रीमध्ये 33 , हेमकुंड साहिब मध्ये 7 गायमुख ट्रॅक मध्ये 1 यात्रेकरूंचा मृत्यू झाला. 
 
 
Edited by - Priya Dixit