गोवा विमानतळावर १ कोटीचे सोने जप्त  
					
										
                                       
                  
                  				  गोव्यातील दाबोळी विमानतळावर एक कोटी रुपये किमतीचे तस्करीचे सोनं जप्त करण्यात आलं आहे.  शारजाहमधून या सोन्याच्या दागिन्यांची तस्करी कऱण्यात आली होती. सव्वातीन किलोचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. 
				  													
						
																							
									  
	 
	एकूण 3 किलो 229 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अवैध मार्गाने शारजातून भारतात आणण्यात आले होते. विमानतळावरील अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी या प्रवाशांची झडती घेतली. यावेळी आरोपीनं कमरेला जाडजूड सोनं बांधलं असल्याचं आढळून आलं. हे कोझिकोडचे रहिवासी असलेले दोन्ही प्रवासी एअर अरेबियाच्या विमानातून गोव्यात उतरले होते.