शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (10:32 IST)

बालदिनी येणार मराठी मुलीचे गुगलवर डूडल

राज्यातील सांस्कृतिक  पुण्याच्या अन्विता तेलंग हिने तयार केलेले ‘डुडल’ बालदिनी (१४ नोव्हेंबर) गुगल इंडियाच्या होमपेजवर झळकणार आहे. डुडल फॉर गुगल स्पर्धेत इयत्ता चौथी ते सहावीच्या गटात अन्विताला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे.त्यामुळे आपल्या देशाला आणि त्यातही लहान मुलीला मोठा बहुमान प्राप्त झाले आहे. अन्विताचे सर्वत्र कौतुक होता आहे. 
 
बालदिनाच्या निमित्ताने डुडल तयार करण्याची स्पर्धा घेतली जाते. भारतात २००९ पासून ही स्पर्धा सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेली ही स्पर्धा पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा तीन गटांत घेतली जाते. बालदिन या संकल्पनेवर आधारित डुडल मुलांनी तयार करायचे असते. यावर्षी ‘मी कुणाला काही शिकवू शकत असेन, तर ते काय असेल?’ अशा आशयावर आधारित संकल्पना देण्यात आली होती. त्यामुळे आता अनेक मुळे मुली शिक्षण आणि कला या कडे सकारत्मक पद्धतीने पाहतील आणि एक आत्मविश्वास त्यांना प्राप्त होईल असे मत गुगल ने व्यक्त केले आहे.