testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चंद्रशेखर यांना गुगलकडून डुडलमधून अभिवादन

google doodal
Last Modified शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017 (10:01 IST)

भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांच्या जन्मदिनानिमित्ताने गुगलने डुडलद्वारे त्यांना अभिवादन केले आहे.
त्यात चंद्रशेखर यांनी केलेले संशोधन दाखवण्यात आले आहे.

आधुनिक खगोलशास्त्रात त्यांनी मुलभूत आणि महत्त्वाचे काम केले होते. यासाठी त्यांना 1983सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल देण्यात आले होते.

डॉ.चंद्रशेखर यांची खरी ओळख ‘चंद्रशेखर मर्यादा’ अशी केली जाते.
पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चंद्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते, असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले होते. त्यांनी सूर्यापेक्षा लहान असलेल्या ताऱ्यांचे अस्तित्व कशामुळे टिकून आहे हे मांडले होते. त्यांच्या या संशोधनाला सुरुवातीला विरोध झाला.यावर अधिक वाचा :