गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

देशातले ‍पहिले खासगी रेल्वेस्टेशन

भोपाळमधील हबीबगंज हे देशातले सार्वजनिक व खासगी सहकार्यातून विकसित होणारे पहिले रेल्वे स्टेशन असले. खासगी सहकार्यातून विकसित होणार्‍या या पहिल्या स्टेशननंतर या यादीत आनंदविहार, चंदिगढल गुजरातेतील गांधीनगर व पुण्याचे शिवाजीनगर यांचा नंबर लागणार आहे. भारतीय रेल्वे विकास प्राधिकरणारने ही घोषणा केली आहे. या स्थानकांचा विकास आंतरराष्ट्रीय मानकांनुसार केला जाणार आहे. हबीबगंज विकासाचे अधिकार बंसल ग्रुपला दिले गेले आहेत.
 
या करारानुसार बन्सल ग्रुपकडे 8 वर्षांसाठी हबीबगंजचे अधिकार राहतील. त्यात त्यांनी स्टेशनचे बांधकाम, देखभाल व ते चालविणे अपेक्षित आहे. कंपनीला स्टेशच्या मालकीची जमीन 45 वर्षांच्या लीजने दिली जात असून तेथे जागतिक स्तरावरचे शॉपिंग प्लाझा, रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थ दुकाने, पार्किंग सुविधा करायची आहे. या स्टेशनसाठी सौरऊर्जेचा वापर केला जाणार असून दिव्यांगांसाठी विशेष सुविधा असतील. यात 100 कोटी रूपये गुं‍तविले जाणार आहे तसेच आसपासच्या ‍जमिनीचा व्यावसायिक विकास करण्यासाठी 350 कोटी रूपयांची तरतून आहे.
 
आणीबाणीच्या काळात चार निमिटात सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढता येईल अशा पद्धतीने हे स्टेशन विकसित केले जाणार आहे.