testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सईदचे स्वप्न भारतावर हल्ला

hafiz saied
Last Modified मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 (10:03 IST)
दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने लष्कर ए तोयबा भारतावर हल्ला करण्यासाठी नवा कट आखल्याचे वृत्त आतातरी आहे. यावेळी नद्यांच्या मार्गाने दहशतवादी सीमा परिसरातील भारतात घुसखोरी करण्याची शक्यता आहे.दोन नद्यांच्या पात्रांतून
जम्मूमधील निक्वी तवी आणि बडी तवी या लष्कर ए तोयबाचे अनेक दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.मात्र आपल्या लष्करामुळे हे स्वप्न सध्या तसेच राहील आणि तो कधीही यशस्वी होणार नाही असे आहे.

या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराकडूनही सर्वतोपरी मदत पुरविली जात आहे असे नेहमीचे चित्र आहे. लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू याच्यावर मोहिमेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दलाकडून पार्श्वभूमीवर निक्वी तवी आणि बडी तवी नद्यांसह जवळपासच्या ओढे आणि नाल्यांच्या परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

आपल्या देशातील सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांनी १५ वेळा घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. दहशतवाद्यांनी नदी, नाले आणि जंगलाच्या परिसरातून घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.त्यामुळे आता आपला भारत पूर्ण जबादारीने निर्णय घेत पुढचे पाऊल उचालाणार आहेत.


यावर अधिक वाचा :