गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (17:24 IST)

दहावीचा अभ्यासक्रम निम्मा करा - मुख्याध्यापक, शिक्षक संघटनेची मागणी

कोरोनाच्या साथीमुळे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने अभ्यासक्रम निम्म्याने कमी करावा अशी मागणी मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी केली आहे.
 
सध्या ऑनलाईन शिक्षण देण्यात येत असल्याने दहावीचा 25 टक्के अभ्यासक्रम यापूर्वीच कमी करण्यात आला होता.
 
दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मे - जून महिन्यात होणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलंय.
 
पण राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळू शकत नाही, त्यामुळे अशा मुलांचा अभ्यासक्रम प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर पूर्ण करता यावा, या विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी पूर्ण करून घेता यावी यादृष्टीने ही मागणी मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी केली आहे.