गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मे 2023 (21:30 IST)

पुलवामात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली

suicide
जवानाने जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे ड्यूटीवर असताना स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली. योगेश अशोक बिऱ्हाडे (वय ३७, रा. आनंदनगर, भोई सोसायटी, धुळे) असे मृत जवानाचे नाव आहे. दरम्यान, त्या आत्महत्येमागील नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.
 
केंद्रीय राखीव दल अर्थात सीआरपीएफमध्ये योगेश बिऱ्हाडे कार्यरत होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचा म्हणून त्याची ओळख होती. २५ जानेवारी २००६ मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. त्यांनी छत्तीसगड, मुंबई येथील तळोजा, त्यानंतर जम्मू-काश्मीर, नांदगाव येथेही सेवा दिली. सध्या ते जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे देशसेवा बजावत हाेते. ते रजेवर असल्याने धुळ्यातील घरी आलेले होते. त्यांची रजा संपल्यानंतर ४ मे रोजी ड्यूटीवर हजर होण्यासाठी निघाले होते. मात्र, जाताना त्यांची गाडी चुकली होती. त्यामुळे त्यांना जाताना उशीर झाला होता. या कारणावरून त्यांना अधिकाऱ्यांनी त्रास दिला असावा असा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे.

 
Edited by : Ratnadeep Ranshoor