1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (17:40 IST)

सिक्कीमच्या नाथूला येथे जोरदार हिमस्खलन, सहा ठार, 11 जखमी

Heavy avalanche in Nathula Sikkim six killed 11 injured
ANI
सिक्कीम नाथूला येथे प्रचंड हिमस्खलन झाल्याची माहिती आहे. यादरम्यान 11 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय अन्य 11 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक पर्यटक अडकल्याचीही शक्यता आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

सदर घटना12:20 वाजता घडली यात जखमी झालेल्या सहा जणांचा जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी गंगटोक येथील एसटीएनएम हॉस्पिटल आणि सेंट्रल रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे
 
सिक्कीमच्या नाथुला सीमेवर झालेल्या हिमस्खलनात सहा पर्यटकांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. त्याचवेळी वृत्तसंस्था एएनआयने पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, गंगटोक ते नाथुला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू रोडवरील 14व्या मैलावर बचावकार्य सुरू आहे. बर्फात अडकलेल्या 22 पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. रस्त्यावरून बर्फ हटवल्यानंतर, अडकलेल्या 350 पर्यटक आणि 80 वाहनांचीही सुटका करण्यात आली आहे.
 
 Edited By - Priya Dixit