1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पुण , मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (18:18 IST)

पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस

Heavy rain to fall again
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थनातील काही जिल्ह्यांना तर पावसानं झोडपून (Heavy Rainfall) काढलं आहे. त्यामुळे येथील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याठिकाणी आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
 
सध्या मध्य प्रदेशात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मागील चार पाच दिवसांपासून मध्य प्रदेश आणि आसपासच्या परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पण मागील तीन-चार दिवसांच्या तुलनेत आज पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. हिमाचल प्रदेश आणि हरियाणात मात्र पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.