शनिवार, 8 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (21:04 IST)

कोरोना लस मिळाल्यानंतर त्याचं उत्पादन आणि विकासात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका

india- gobal week 2020
“मला आशा आहे की कोरोना लस मिळाल्यानंतर त्याचं उत्पादन आणि विकासात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका असेल,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूकेमध्ये आयोजित ‘इंडिया ग्लोबल वीक २०२०’ चं व्हर्च्युअलपणे उद्घाटन केलं. या वेळी भाषण ते बोलत होते. आमच्या कंपन्या कोरोना लसीच्या विकास आणि उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नात सक्रिय आहेत, असंही मोदी म्हणाले.
 
पंतप्रधान म्हणाले की, साथीच्या रोगाने पुन्हा एकदा हे दाखवून दिले आहे की, देशातील फार्मा उद्योग हा फक्त भारतासाठीच नाही तर जगासाठी महत्त्वाचा ठरतो आहे. विशेषत: विकसनशील देशांसाठी औषधाची किंमत कमी करण्यात प्रमुख भूमिका आहे. इतिहास दर्शवितो की भारताने सामाजिक किंवा आर्थिक आव्हानांवर विजय मिळविला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की भारत कोरोनाच्या विरोधात जोरदार लढा देत आहे. देशाच्या अर्थकारणावर लक्ष केंद्रित करत आहोत. जगातील सर्वात खुली अर्थव्यवस्था म्हणून भारत एक आहे. आम्ही जगभरातल्या गुंतवणूकदारांचं भारतात स्वागत करतो.