testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आयसिसच्या तीन संशयितांना अटक

Last Modified गुरूवार, 20 एप्रिल 2017 (13:03 IST)
मुंबई, जालंधर आणि बिजनोरमधून दिल्ली पोलिसांनी आयसिस या दहशतवादी संघटनेच्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेले संशयित दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या पथकाला मिळाली होती.
पोलिसांनी आणखी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाच राज्यांमध्ये गुरुवारी छापे घातले. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये आयसिस ही दहशतवादी संघटना हल्ला घडवण्यासाठी नवीन तरुणांची भरती करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांच्या पथकांनी ही संयुक्त कारवाई केली.


यावर अधिक वाचा :