शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

इवांका ट्रंपबद्दल जाणून घ्या 10 खास गोष्टी...

जगातील सर्वात शक्तिशाली मुलींमध्ये सामील अमेरिकी राष्‍ट्रपति डोनाल्ड ट्रंपची मुलगी इवांका ट्रंप सध्या हैदराबादमध्ये आहे. ती येथे ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप (जीईएस) 2017 मध्ये भाग घेणार आहे. 
जाणून घ्या इवांका ट्रंपशी निगडित 10 खास गोष्टी ...
 
1. इवांका जेव्हा 10 वर्षांची होती, तेव्हा तिचे वडिल डोनाल्ड आणि आई इवाना ट्रंप यांचे घटस्फोट झाले होते. इवांकाचा जन्म 1981मध्ये झाला होता. डोनाल्ड ट्रंपचे पहिल्या लग्नापासून फक्त इवांकाच आहे. इवांकाची 
आई इवाना एक चेक एथलीट आणि मॉडल होती.  
 
2. इवांका ने 15 वर्षाच्या वयात मॉडलिंगच्या जगात आपले पाऊल ठेवले. 2008मध्ये टाउन एंड कंट्री मॅग्झीनच्या कव्हर पानावर इवांकाला स्मार्ट, सक्सेसफुल आणि सेक्सी सांगण्यात आले होते. 2007मध्ये मॅक्सिम हॉट 100 आणि 2008मध्ये ऑक्समॅन डॉट कॉमच्या शीर्ष 99च्या यादीत ती सामील होती.  
 
3. इवांका ट्रंप नावाजलेली फॅशन डिझायनर आहे आणि ती स्वत:चे आउटफिट्स डिझाइन करते. तिने आपल्या नावाने एक ब्रांड देखील सुरू केले आहे. आपल्या नावाने ती जोडे, कपडे आणि हँडबैग विकते. तिच्या स्टायल आणि फॅशन सेंसची चर्चा नेहमी अमेरिकी मीडियेत राहते.  
 
4. यशस्वी मॉडल सोबतची ती एक यशस्वी उद्यमी देखील आहे. राष्ट्रपति ट्रंप यांच्या निवडणुक अभियानात इवांकाने जबरदस्त भूमिका निभावली होती.
 
5. 35 वर्षांची इवांकाचा राजकारणात देखील दबदबा आहे. असे म्हटले जाते की वडिल डोनाल्ड ट्रंप तिच्या सल्ला बगैर कुठलेही निर्णय घेत नाही. ट्रंप यांनी एकदा मुलाखतीत हे ही म्हटले होते की जर इवांका त्यांची मुलगी नसती तर ते निश्चितच तिला डेट करत असते. 
 
6. असे म्हटले जाते की इवांकाच्या म्हणण्यानुसार ट्रंप यांनी एप्रिल 2017मध्ये सीरियात बर्‍याच मिसाइल्स सोडल्या होत्या.  
 
7. इवांकाच्या कुटुंबात नवरा जेरेड कुश्नर आणि तीन मुल अराबेला, जोसेफ आणि थियाडोर आहे.  
 
8. जेरेडशी लग्नानंतर तिने यहूदी धर्म स्‍वीकारला.  
 
9. इवांकाने दोन पुस्तक देखील लिहिले आहे ज्यात पहिली पुस्तक आहे  ट्रंप कार्ड जी वर्ष 2009मध्ये रिलीज झाली. तिचे दुसरे पुस्तक होते, 'वीमेन हू वर्क : रिराइटिंग द रूल्‍स फॉर सक्‍सेस'. 

10. भारताबद्दल इवांकाचे मानने आहे की आम्ही एकत्र येऊन मोठे मोठे काम करू शकतो. आम्ही दोन्ही देश आर्थिक प्रगती आणि सुधाराला महत्तव देत आहो. आम्ही दहशतवादाविरुद्ध लडत आहोत आणि सुरक्षा सहयोगला वाढवत आहो. इवांका भारतीय इतिहास आणि संस्कृतिची प्रशंसक आहे.