सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 19 मे 2018 (09:18 IST)

येडियुप्पांनी घेतली ज्योतिषांकडे धाव

कर्नाटकातील येडियुरप्पा सरकारने शनिवारीच बहुमत सिद्ध करावे असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने  दिले आहेत. राज्यपाल वजुभाई वाला यांनी यापूर्वी येडियुरप्पांना ३१ मे पर्यंत मुदत दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अडचणीत आलेल्या येडियुप्पांनी आता ज्योतिषांची धाव घेतली आहे. 
 
येडियुरप्पांनी ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार विधानसभेचे सत्र सुरु करण्यासाठी ठिक ११ चा मुहूर्त निश्चित केला आहे. विधानसभेचे कामकाज सुरु होताच सुरुवातील नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यात येईल. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे.
 
कर्नाटकात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसल्याचे स्पष्ट झाले. भाजपला सर्वाधिक १०४ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला ७८ आणि जनता दल सेक्युलरला ( जेडीएस) ३८ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस –जेडीएस आघाडीने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा सादर केला होता. मात्र राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले.