बुधवार, 10 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जानेवारी 2019 (17:32 IST)

पतंगाने घेतला ६ जणांचा जीव, ५०० पेक्षा अधिक मृत्यू

Kite took life

देशभरामध्ये मकरसंक्रात मोठ्या उत्साहत आणि आनंदात साजरी होतोय. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवला जातो. गुजरातमध्ये पतंग उडवणाऱ्यांनी मजा घेतली खरी पण यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पतंग उडवताना १४ जानेवारीला मांज्यामुळे गळा चिरुन सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या मांज्यामुळे गुजरातच्या वेगवेगळ्या ठिकाणी ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये छतावरुन कोसळून १०० पेक्षा अधिक आहेत. गुजरातमध्ये १४ आणि १५ जानेवारीला पतंग उडवतात. पतंग उडवताना निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवतात.  गुजरातमध्ये अनेक ठिकाणावरुन १०८ क्रमांकावर अनेक कॉल आले. पंतग उडवताना छतावरुन पडून तसंच पतंगीचा मांजा कापल्यामुळे जखमी झाल्याचे अनेक कॉल आले होते. मेहसाणा जिल्ह्यामध्ये पतंगीच्या धारधार मांज्यामुळे गळा चिरल्याने आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर आनंदमधील बदलापूर येथे एका तरुणाचा मांज्यामुळे गळा चिरला.  त्याचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे बनासकांठा जिल्ह्याच्या डीसावाडी रोडवर पतंग उडवताना छतावरुन पडूनन १० वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला.अरवल्लीच्या मोडासामध्ये स्कूटरवरुन गांधीनगरला जाणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीचा मांजामुळे गळा चिरला आणि तिचा मृत्यू झाला. अहमदाबादच्या रामपुरा गावामध्ये तरुणाचा मांज्याने गळा चिरुन मृत्यू झाला. अशापध्दतीने पतंगीच्या मांज्यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला असून ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.