शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जानेवारी 2018 (08:28 IST)

चारा घोटाळा सुनावणी : शिक्षेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावरील शिक्षेची सुनावणी आज पुन्हा पुढे ढकलण्यात आली. चारा घोटाळा प्रकरणी ‘राजद’ नेते लालू प्रसाद यादव यांच्यासह १६ जणांना बुधवारी (३जानेवारी) सीबीआयच्या विशेष न्यायालयात शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र, सीबीआय न्यायलयातील सहकारी वकील विंदेश्‍वरी प्रसाद यांचे निधन झाल्यामुळे ही सुनावणी आज (गुरुवार) होणार होती. मात्र आजही ही सुनावणी होऊ शकली नाही. 

रांचीतील विशेष सीबीआय न्यायालयाने राजदचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह अन्य १५ जणांना २३ डिसेंबरला न्यायलयाने दोषी ठरवले होते. लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यांत कोषागारातून चारा खरेदीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचा आरोप आहे.