Widgets Magazine
Widgets Magazine

उत्तराखंडमध्ये भूस्खलन होऊन 15 हजार भाविक अडकले

शनिवार, 20 मे 2017 (13:03 IST)

उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे जवळपास 15 हजार भाविक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादच्या 102  भाविक रूद्रप्रयागमध्ये अडकले असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथचा रस्ता बंद झाला असून तो पुन्हा सुरु करण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. विष्णूप्रयाग परिसरातील हाथी पर्वत भागात भूस्खलन होऊन 15 हजार भाविक अडकले आहेत. चामोली जिल्ह्यातील जोशीमठ भागापासून 9  किलोमीटर अंतरावर भूस्खलन झालं. भूस्खलनानंतर रस्त्यावर पडलेल्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटवून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.  त्यामुळे बद्रिनाथकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

लालू प्रसाद यादव यांचा टोमणा भाजपचे तारुण्य आता संपले

राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी भाजपवर टोमणा मारला आहे की भाजपचे तारुण्य संपले आहे, ...

news

कर्जमाफीसाठी आम्ही म्हायुतीत आलो : राजू शेट्टी

शेतकरी कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोग लागू करणार यासाठी मी महायुतीत आलो होत. मात्र तसे ...

news

कर्जमाफी केल्यास सरकारला धक्का लागू देणार नाही - उद्धव ठाकरे

आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, आम्ही बाहेरुन विनाशर्त पाठिंबा देतो, कर्जमाफी केल्यास ...

news

5 लाखांच्या नवीन बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

औरंगाबादमधून तब्बल 5 लाख रुपयांच्या नवीन बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त ...

Widgets Magazine