शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 19 जानेवारी 2019 (09:12 IST)

लोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार

लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच निवडणूक आयोगाकडून घोषणा होणार  आहे.  निवडणूक किती टप्प्यात आणि कोणत्या महिन्यात होणार, यावर निवडणूक आयोगाची चर्चा सुरु आहे. त्यादृष्टीने सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे. सुरक्षा दल आणि अन्य सुविधांच्या उपलब्धतेनुसार निवडणुकीचे टप्पे ठरवले जातील. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 
 
लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीम आणि अरूणचाल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुका आटोपण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे.