शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जून 2020 (08:49 IST)

यात्रेला परवानगी दिल्यास भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाहीत

सुप्रीम कोर्टाने ओडिशाच्या पुरीमध्ये 23 जूनपासून सुरू होणाऱ्या भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेवर गुरुवारी बंदी लावली आहे. चीफ जस्टिस एसए बोबडे म्हणाले की, ‘कोरोना काळात यात्रेला परवानगी दिल्यास भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाहीत.’
 
सुप्रीम कोर्टाने पुढे म्हटले की, कोरोना महामारी सर्वत्र पसरली असल्यामुळे यात्रेला परवानगी दिली जाऊ शकत नाही. नागरिकांची सुरक्षा पाहता, यावर्षीची यात्रा होऊ शकत नाही. चीफ जस्टिस यांच्या बेंचने ओडिशा सरकारला सांगितले की, यावर्षी यात्रेसंबंधी कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी दिली जाऊ नये.
 
रथयात्रेवर अनेक दिवसांपासून प्रश्नचिन्ह होते. यादरम्यान, भुवनेश्वरमधील एनजीओ ओडिशा विकास परिषदने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यात्रा रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकेत म्हटले की, लोकांच्या सुरक्षेखातर दिवाळीला फटाके फोडण्यावर कोर्ट बंदी घालू शकतो, तर रथयात्रेवर का बंदी घालता येणार नाही ?