बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 नोव्हेंबर 2023 (20:03 IST)

दरभंगा एक्स्प्रेसच्या 3 डब्यांना भीषण आग, प्रवासी सुखरूप

fire
Fire in Darbhanga Express: उत्तर प्रदेशातील इटावाजवळ बुधवारी दरभंगा एक्सप्रेसच्या 3 बोगींना आग लागली. ही ट्रेन नवी दिल्लीहून दरभंगाला जात होती. छठमुळे बिहारमधील लोक मोठ्या संख्येने आपापल्या घरी परतत आहेत. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले ही दिलासादायक बाब आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रेनच्या बोगीमध्ये आगीच्या अनेक ज्वाळा उठताना दिसत आहेत. नवी दिल्ली दरभंगा एक्सप्रेसचा क्रमांक 02570 आहे. या अपघातात किती जण जखमी झाले आहेत, याबाबत सध्या तरी रेल्वेकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रिझर्व्हेशन कोचमध्ये आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मात्र, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग पूर्णपणे आटोक्यात आणता आली नाही. या आगीत प्रवाशांचे सामान जळून खाक झाले आहे. उल्लेखनीय आहे की छठ सणाला लोक घरी जात असल्याने बिहारला जाणाऱ्या गाड्यांमध्ये खूप गर्दी असते.