शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

विमानात महिलेला अश्लील इशारे, वृद्धाला अटक

Man caught masturbating mid-air on Hyderabad-Delhi flight
दिल्ली पोलिसांनी एका 56 वर्षाच्या वृद्धाला महिलेला अश्लील इशारे केल्याप्रकरणी अटक केली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आंतरदेशीय टर्मिनलवरून या वृद्धाला अटक करण्यात आली आहे. हैदराबाद- दिल्लीच्या इंडिगो फ्लाईटमध्ये हा प्रकार घडला आहे.
 
या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हैदराबादहून दिल्लीला येणार्‍या विमानात एक 44 वर्षीय महिला प्रवास करत होती. त्यावेळी 56 वर्षाच्या वृद्धाने तिच्याकडे पाहून अश्लील शेरेबाजी सुरू केली. ज्यानंतर या महिलेने अलार्म बाजवला.
 
विमान कर्मचार्‍यांनी तातडीने या महिलेला तिची जागा बदलून दिली. तसेच या वृद्धाविरोधात दिल्लीत उतरून पोलिसात तक्रार करा असेही सांगितले. त्यानंतर या महिलेने दिल्ली विमानतळ गाठल्यावर या वृद्धाविरोधात तक्रार केली. ज्यानंतर अश्लील चाळे करणार्‍या या वृद्धाला पोलिसांनी अटक केली आहे.
 
अश्लली शेरेबाजी करणार हा वृद्ध विमानात पीडित महिलेच्या शेजारीच असलेल्या सीटवर बसला होता. ही महिला जागेवर येताच त्याने आपल्या पँटची चेन उघडून अश्लील चाळे केले, तसेच या महिलेला अश्लील इशारेही करून दाखवले. ज्यानंतर या महिलेने तातडीने अलार्म वाजवला, आपली जागा बदलून घेतली.