1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कुत्र्यासाठी खून, कुत्र्याला दगड मारला म्हणून गोळी झाडली

murder due to dog
लहान-लहान गोष्टींवर राग येणे आणि त्यामुळे गुन्हा घडणे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. असेच एक प्रकरण उत्तर-पूर्वी दिल्लीत घडले, जिथे एका कुत्र्यामुळे त्याच्या मालकाने एका तरुणावर गोळी झाडली.
 
दिल्ली येथील वेलकम कॉलोनीत एका तरुणाने कुत्र्याला दगड फेकून मारले तर मालकाने रागात त्या तरुणावर गोळी झाडून त्याचा खून केला. मृतकाचे नाव अफाक असे आहे. तो रविवारी फिरायला निघाला त्या दरम्यान त्यावर कुत्रा भुंकू लागला. कुत्र्याने चावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अफाफने कुत्र्याला पळवण्यासाठी दगड फेकून मारला.
 
कुत्र्याचा मालक महताबने हे बघितल्यावर घरातून बंदूक आणली. त्यांच्या काही वाद घडला आणि नंतर महताबने अफाकला गोळी झाडली.
 
त्यानंतर लगेच तरुणाला रुग्णालयात हालवण्यात आले परंतू त्याचा मृत्यू झाला. सध्या गुन्हेगार महताब फरार आहे आणि पोलिस प्रकरणाबद्दल चौकशी करत असून महताबचा शोध घेत आहे.