Widgets Magazine

संसदीय स्थायी समिती मतदान यंत्रांची चौकशी करणार

Last Modified बुधवार, 15 मार्च 2017 (08:56 IST)

बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांची उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी झाली असल्याची तक्रार निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. मात्र आता

याबाबत
संसदीय स्थायी समितीने याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुकीमधील मतदान यंत्रांत हेराफेरी झाल्याच्या तक्रारींची ही समिती चौकशी करणार आहे. महाराष्ट्रातील विविध शहरे व जिल्ह्यांतून याबाबत तक्रारी आल्या आहेत. तसेच याचे पुरावेही पाठविण्यात आले आहेत. विशेषत: पुणे, नाशिक, धुळे व इतरही ठिकाणांहून अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.यावर अधिक वाचा :