1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2023 (17:01 IST)

होळीमध्ये विदेशी तरुणीसोबत गैरवर्तन!

Mistreatment of a foreign girl in Holi
होळीचा सण सर्वांना आनंद देऊन जातो, असे म्हणतात .लोक एकमेकांना रंग आणि गुलाल लावतात, परंतु अनेकदा लोक ते जबरदस्तीने करू लागतात. होळी खेळणे, रंग, गुलाल लावणे हे कोणालाच वाटत नाही, पण तरीही इतर लोक जबरदस्तीने रंग लावतात, त्याच्याशी गैरवर्तन करतात. अतिथी देवो भव: असे म्हणतात पण भारतात  भेट देण्यासाठी आलेल्या विशेषत: परदेशी महिलेसोबत असे गैरवर्तन होत असेल तर ती अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे , ज्यामध्ये काही मुले बळजबरीने महिलेला रंग लावताना दिसत आहेत. ही महिला जपानची असून ती भारताला भेट देण्यासाठी आली असल्याचा दावा केला जात आहे. हे वर्णतुक लाजिरवाणे असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगा बळजबरीने एका जपानी मुलीला रंग लावत आहे. रंग लावून ते मुलं गैर वर्तन  करत आहे. या दरम्यान मुलगी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. एका दुसऱ्या मुलाने देखील तिला रंग लावण्याचा प्रयत्न केला तरी ही महिला त्याला कानशिलात लगावते. 
हा व्हिडीओ 24 सेकंदाचा असून  हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Sweety52216366 नावाच्या आय डीसह शेअर करण्यात आला आहे.
 
 
Edited By - Priya Dixit