रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 डिसेंबर 2018 (17:03 IST)

मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं’ -कॉंग्रेस

राज्यातील निवडणुका निकाल लागले आणि सर्वत्र त्याचे पडसाद दिसून येत असून, कॉंग्रेस भाजपवर जोरदार टीका करत आहे. या  जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले असून,  हा धनशक्तीवर जनशक्तीचा विजय असून   २०१९ मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. त्यामुळे  ‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं’ असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.या देशात आलेली मोदी लाट पूर्णतः  ओसरली असून हे सिसून येते आहे.  देशात मोदींच्या नेतृत्वाचा प्रभाव जाणवला नाहीच,  काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर करडी नजर ठेवली होती त्यामुळे भाजपाला मतदान यंत्रात फेरफार करणे शक्यच  झाले नाही, हा लागलेला निकाल म्हणजे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती प्रभावी ठरली असेच म्हणावे लागेल.महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी या मुद्यांवर भाजपाचे सरकर सपशेल अपयशी ठरले आहे. हा हुकूमशाहीवर लोकशाहीचा विजय आहे. भाजपा मोजक्या उद्योगपतींसाठी सत्तेचा वापर करतं हे सर्वानाकळून चुकले असून, असा आरोप त्यांनी केला.