मुरादाबाद: किड्यांनी खाल्ले बँकेच्या लॉकर मधून 18 लाख रुपये  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  मुरादाबाद. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील बँक ऑफ बडोदा शाखेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे वाळवीने महिलेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने आणि 18 लाख रुपयांची नासधूस केली. महिलेने आपल्या मुलीच्या लग्नाचे दागिने आणि पैसे बँक ऑफ बडोदाच्या आशियाना शाखेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. बँकेने लॉकर करार आणि केवायसीचे नूतनीकरण करण्यासाठी महिलेला बोलावले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
				  													
						
																							
									  महिलेने लॉकर उघडले असता प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या 18 लाख रुपयांच्या नोटा आणि दागिने वाळवीने खालले  होते. यानंतर महिलेचे भान हरपले. याबाबत महिलेने बँक मॅनेजरकडे तक्रार केली असता एकच खळबळ उडाली.
				  				  
	 
	 मिळालेल्या माहितीनुसार, आशियाना कॉलनीत राहणाऱ्या अलका पाठक यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी ऑक्टोबर 2022 मध्ये बँक लॉकरमध्ये दागिने आणि 18 लाख रुपये ठेवले होते. सोमवारी त्यांना बँकेने लॉकरचे नूतनीकरण आणि केवायसी अपडेटसाठी बोलावले होते. लॉकर उघडल्यावर त्यांना धक्काच बसला. प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेले 18 लाख रुपये वाळवीने खाल्ल्याचे दिसले. पिशवीत नोटांचा भुगा झाला होता आणि काहीच तुकडे शिलक्क होते.. याबाबत त्यांनी बँक व्यवस्थापकाकडे तक्रार केली असता एकच खळबळ उडाली. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र ही बाब उघडकीस येताच ती वाऱ्यासारखी पसरली.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	अलका पाठक यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 मध्ये तिच्या दुसऱ्या मुलीच्या लग्नासाठी तिने 18 लाख रुपये आणि काही दागिने लॉकरमध्ये ठेवले होते. लॉकरमध्ये पैसे ठेवलेले नसल्याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. अलका पाठक यांनी सांगितले की, बँक मॅनेजरने तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. जी काही माहिती मिळेल ती शेअर केली जाईल.अलका म्हणाल्या, त्यांच्या समोर एक दोन ग्राहकांच्या लॉकर मध्ये देखील  वाळवीने नासधूस केल्याची तक्रार आली. 
				  																								
											
									  
	 
Edited by - Priya Dixit