शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (13:15 IST)

गाजीपुरमध्ये भोजपुरीत बोलले मोदी

- ज्यांच्या विरोधात कारवाई करतोय ते शक्तीशाली आहेत, त्यांच्याकडे सरकार उलथवण्याची ताकत आहे, पण तुमचा आशीर्वादाच्या बळावर ही लढाई लढतोय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- नोट फेकणारे सीसीटीव्ही कॅमे-यात सापडले तर त्यांच्याकडूनही हिशोब घेणार, गरीबांचा पैसा लुटू देणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- सीमेपलीकडे बनावट नोटा छापल्या जातात, दहशतवाद, नक्षलवादासाठी हा पैसा वापरला जातो - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.
- काँग्रेसने त्यांच्या राज्यात २५ पैसे बंद, तुम्ही चारआण्याच्या पुढे जात नाही, तुम्ही तुमच्या बरोबरीचे काम केले आम्ही आमच्या बरोबरीचे काम केले - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- काँग्रेसने १९ महिने देशात लावली आणीबाणी लावली, कोटयावधी रुपये तुमच्या नेते कार्यकर्त्यांनी हडप केले होते, तुम्ही संपूर्ण देशाला जेलखाना बनवून टाकला होता - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- गरीबांची मदत करण्यासाठी शक्य ते सर्व करतोय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- तुम्हाला जो त्रास होतोय त्यामुळे मला प्रचंड वेदना होतायत तुमचा त्रास कमी करण्यासाठी जे शक्य आहे ते मी करतोय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- प्रत्येक घरात जाऊन भ्रष्टाचार हटवू शकत नाही, त्यामुळे मी एकाचवेळी ५०० आणि १ हजार रुपयांची नोट रद्द केली - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.
- मी जे करतोय ते शेतकरी, गरीबांच्या भल्यासाठी करतोय - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.
- काम कुठलेही असो त्रास होणारच, उद्देश प्रामाणिक असला पाहिजे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.

- भारतात आता अप्रामाणिक लोकांना जागा नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- भारतात पैशांची कमतरता नाही पण पैसा कुठे आहे ती समस्या आहे, जिथे पैसा असायला हवा तिथे नाहीय आणि जिथे नको तिथे पैशाच्या राशि आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- उत्तरप्रदेशातून आलेलो मी नववा पंतप्रधान आहे, पंडितजी तुमचे कुटुंबिय माझ्यावर आरोप करतात, तुमचा पक्ष माझ्यावर आरोप करतो, पण तुमच्यावेळी अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- गाझीपूरचे खासदार म्हणून संसदेमध्ये बोलताना विश्वनाथ यांनी पूर्वांचलची गरीबी हटवण्यासाठी दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंकडे विनंती केली होती - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- पंडित जवाहरलाल नेहरुंच्या जन्मदिनी मी उत्तरप्रदेशातील पूर्वांचलच्या विकासाची सुरुवात करत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- गाझीपूरमध्ये रेल्वे प्रकल्पाच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत.
- नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा असणारे झोपेच्या गोळ्यात खात आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- मोदींनी भोजपुरी भाषेतून केली भाषणाला सुरुवात.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे सभा.