शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (11:57 IST)

एकत्र निवडणुका व्हाव्यात : मोदी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवसआधी दिल्लीत गुरुवारी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेचं हिवाळी अधिवेशन शांततेत चालण्यासाठी सर्वपक्षांना सहकार्याचं आवाहन केलं. यासोबतच लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा मुद्दा त्यांनी पुन्हा उपस्थित केला.
 
राज्यांना देण्यात येणारा जीएसटीचा वाटा, मुस्लिम महिलांचा लग्नाचा हक्क २०१७ या मुद्द्यांसह तीन अध्यादेशांवर संसदेच्या अधिवेशनात प्रामुख्याने चर्चा होईल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी दिली.
 
संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलंय. यामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह आहेत. जीएसटी, नोटाबंदी, राफेल विमान खरेदी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक सरकार घेरण्याचा प्रयत्न करतील. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणामही अधिवेशनात दिसून येईल.