शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मोदींचा आरोप खरा अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री होते

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री उपस्थित असल्याचा आरोप केला होता. याम्ध्ये   गुजरात निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा मोठा आरोप मोदी यांनी केला. पंतप्रधानांचा हा आरोप खोटा असे सांगत कॉंग्रेस ने आरोप  फेटाळून लावला. हताशेमधून ते असे आरोप करत असल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले होते. 

मात्र आता नवीन  माहिती समोर आली आहे.  यामध्ये  मोदींनी केलेल्या आरोपात तथ्य आहे, कारण बैठक झाली होती  असून 6 डिसेंबरला मणिशंकर अय्यर यांच्या दिल्लीतील घरी झाली होती  या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमहू कसुरी, माजी लष्करप्रमुख दीपक कपूर, माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह तसेच पाकिस्तानातील भारतीय दूतावासात काम केलेले काही अधिकारी उपस्थित होते. लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी  या बैठकीला उपस्थित असल्याचे मान्य केले. मात्र देश विरोधात काहीही बोलणी झाली असून फक्त दोन देशातील सबंध कसे सुधारतील यावर बोलणी झाली आहे.