1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 9 जून 2018 (11:38 IST)

सलीम खान यांची भेट घेतली नितीन गडकरींनी

Nitin Gadkari
‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियाना अंतर्गत भाजपाच्या चार वर्षांच्या राजवटीत केंद्र सरकारने कोणती कामगिरी केली, ती माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि अन्य भाजपाचे मुख्य पदाधिकारी हे अनेक लोकांना भेटत आहेत. याच अभियानाअंतर्गत अमित शाह यांनी माधुरी दीक्षितला ही भेटले होते. आता या अभियानाची महाराष्ट्रात कमान सांभाळत नितीन गडकरी हे आज लेखक सलीम खान, महाराष्ट्राचे नटसम्राट नाना पाटेकर आणि येस बॅंकचे सीइओ राणा कपूरना मुंबईत भेटणार आहेत. या सगळ्याना भेटून नितीन गडकरी हे भाजपाने केलेल्या लोकोपयोगी कामाची माहिती या उच्चभ्रू लोकांना देणार आहेत.
 
नितीन गडकरी हे सलीम खान याना बांद्रा येथील गेलेक्सी अपार्टमेंटमध्ये भेटले . सलीम खान भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट घेण्यास उत्सुक होते. भेटीच्या वेळी सलीम खान यांच्या सोबत सलमान खान तर नितीन गडकरीच्या सोबत आमदार राज पुरोहित उपस्थित होते. मोदी सरकारच्या चार वर्षाची कामगिरी सांगण्यासाठी एक लाखापेक्षा जास्त प्रसिद्ध व्यक्तींना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह चार हजार वरिष्ठ कार्यकर्ते भेटत आहेत. भाजपा कार्यकर्ते लोकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चाही करीत आहेत. तर या मोहिमे अंतर्गत, भाजपचे अध्यक्ष देशाच्या 50 मोठ्या सेलिब्रिटीजशी भेटतील.