बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (08:58 IST)

जितकी प्रगती व्हायला हवी होती, तितकी झाली नाही- मोहन भागवत

Not as much progress as it should have been- Mohan Bhagwat जितकी प्रगती व्हायला हवी होती
गेल्या 75 वर्षांत आपण जितकी प्रगती करायला हवी होती, तितकी प्रगती केलेली नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे
दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित संत ईश्वर सन्मान 2021 कार्यक्रमात संघ प्रमुख मोहन भागवत बोलत होते.
भागवत म्हणाले, "आपण भगवान 'जय श्रीराम'चा नारा जोरात लावतो, पण आपणही त्यांच्यासारखे व्हायला हवे. तो देव होता, असे आपल्याला वाटते. भरतासारख्या भावावर फक्त देवच प्रेम करू शकतो, आपण करू शकत नाही, असा सामान्य माणसाचा विचार आहे. त्यामुळे ते त्या मार्गावर जाऊ शकत नाहीत. स्वार्थपणा सोडून जनतेच्या भल्यासाठी काम करणे अवघड आहे.
 
"जगातील सर्व देशांनी मिळून जेवढे महापुरुष आपल्या देशात गेल्या 200 वर्षांत घडले असतील, तेवढेच घडले आहेत, असेही ते म्हणाले. व्यक्तीचे जीवन सर्वांगीण जीवनाचा मार्ग प्रकट करते."